बँकॉक : आजवर तुम्ही विविध जातीची माकडं पाहिली असतील. प्राणी संग्रहालयातही आपण विविध प्रकारचे माकड पाहतो. मात्र, थायलंडमधील माकड पाहून तुम्हीही चक्राऊन जाल...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या माकडाला पाहण्यासाठी दूरुन लोक येतात. अनेकांसाठी हे मनोरंजन बनलेल्या माकडाला अनोखं नावसुद्धा देण्यात आलंय. या माकडाचं नाव आहे 'अंकल फॅटी'...


हे माकड जणू काही जगण्यासाठी खातं आणि खाण्यासाठीच जगतं.... खाणं हा त्याचा आवडीचा छंद आहे. अंकल फॅटी या माकडाला पाहण्यासाठी येणारे नागरिक आणि प्राणीप्रेमी त्याला खाण्यासाठी सगळ्या गोष्टी टाकतात. साध्या खाण्यापासून ते जंक फूड... कोणतंही खाणं असो त्याला अवघ्या काही क्षणात अंकल फॅटी फस्त करुन टाकतो.


खाणंच नाही तर पिण्याचाही तो शौकिन आहे. एका नागरिकाने अंकल फॅटीला कोल्ड ड्रिंकची बॉटल दिली आणि तीही अंकल फॅटीने तोंडाला लावत संपवली. या सगळ्या गोष्टींमुळे अंकल फॅटीची खाण्या-पिण्याची ऐश होत असली तरी यामुळं त्याचं वजन वाढलंय. 


लठ्ठपणामुळे त्याला इतर माकडांप्रमाणे झाडांवर सरसर चढणं, उड्या मारणं कठीण झालंय. माणसाची भूतदया 'अंकल फॅटी'च्या आरोग्याला घातक ठरत असल्याचं पाहायला मिळतंय.


आपलं वजन वाढलं तर आपण जिम किंवा महागडं डायट फॉलो करुन वजन घटवू शकतो. मात्र प्राण्यांना तशी सोय नाही. त्यामुळं फिरायला गेल्यावर प्राण्यांना सरसकट खायला प्यायला देण्याआधी थोडा विचार करा...