वाशिंगटन : पाकिस्‍तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्याच्या मागणीला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठीच्या ऑनलाइन याचिकेवर आतापर्यंत ५ लाख लोकांनी हस्ताक्षर केले आहे. काही दिवसात ही संख्या १० लाखांवर जाण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हाईट हाऊसच्या या ऑनलाईन याचिकेवर ५ लाख लोकांनी पाठिंबा दर्शवला आहे. ओबामा सरकारला हा निर्णय घेण्यासाठी जेवढं समर्थन हवं होतं त्यापेक्षा हा आकडा ५ पटीने जास्त आहे. एका व्यक्तीने ही याचिका २१ सप्टेंबरला जारी केली होती. यासंबंधी व्हाईट हाउसकडून उत्तर मिळण्यासाठी ३० दिवसात एक लाख हस्ताक्षरांची गरज होती, पण एका आठवड्यात हा आकडा ५ लाखांच्यावर पोहोचला आहे. आता ओबामा सरकारच्या निर्णयाची वाट पाहिली जात आहे.


ही याचिका व्हाइट हाऊसच्या वेबसाइटवर गाजली आहे. याचिकेनुसार ओबामा सरकारने ६० दिवसात याचं उत्तर द्यायचं आहे. फेसबूक पेजवर याचिका टाकणाऱ्या जार्जटाऊन यूनीवर्सिटीचे वैज्ञानिक अंजू प्रीत यांनी म्हटलं आहे की, पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करण्यासाठी या याचिकेवर १० लाख लोकांचे हस्ताक्षर घेऊ त्याआधी हे थांबणार नाही. आता सक्रियता दाखवण्याची वेळ आली आहे. या याचिकेवर हस्ताक्षर करत सगळ्यांनी हात मिळवण्याची गरज आहे. दहशतवादावर अमेरिकन काँग्रेसच्या उपसमितीचे अध्यक्ष टेड पो यांनी काँग्रेसच्या आणखी एका सदस्यासोबत एच आर 6069 ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर २१ ऑक्टोबरपर्यंत हस्ताक्षर करु शकता येणार आहे.