इस्लामाबाद : पाकिस्तानच्या संसदेत सर्जिकल स्ट्राईकवरुन मोठा संग्राम पाहायला मिळाला. संसदेत नवाज शरीफ यांच्याविरोधात घोषणाबाजी झाली. संसदेत विरोधी पक्षाला बोलण्याची संधी न दिल्याने त्यांनी जोरदार गोंधळ घातला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संसदेत विरोधीपक्ष नेते ऐतजाज एहसनने नवाज शरीफ यांना चांगलंच धारेवर धरलं. पाकिस्तान दहशतवाद्यांना संपवण्यात अपयशी ठरला आहे. दहशतवाद्यांवर अंकुश नाही ठेवता येत आहे. मागील आठवड्यात कॅबिनेटच्या बैठकीत सदस्यांनी असं म्हटलं की आम्हाला विश्वास आहे की उरी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात नाही. पण स्पष्ट रुपात त्यांनी याला नाकारलं देखील नाही.


'जर दहशदवाद्यांच्या विरोधात नॅशनल अॅक्शन प्लॅन लागू नाही केला तर याचं नुकसान पाकिस्तानलाच होईल. आपल्याला जगापासून वेगळं केलं जाईल. बांग्लादेश आणि अफगानिस्तान तुमच्यासोबत चर्चा करणार नाही. नेपाळ आणि भूटान भारताचं समर्थन करेल. तुम्ही पाकिस्तानला एकटं पाडलं' असं देखील त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे देशभरातून नवाज शरीफ यांच्यावर टीका होत आहे आणि त्यांच्या चिंता देखील वाढल्याचं दिसतंय.