नवी दिल्ली : पाकिस्तानने ८ ऑक्टोबरपासून कराची आणि लाहोरवरुन एयरस्पेस बंद केले आहे. या दोन्ही शहरांवरुन विमानांचं उड्डान बंद करण्यात आलं आहे. रोज १८ तास विमान वाहतूक बंद राहणार आहे. १३ दिवसांसाठी पाकिस्तानने यावर बंदी घातली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संरक्षण आणि विमान क्षेत्रातील तज्ञांच्या मते पाकिस्तानने त्यांच्या हवाईदलाच्या युद्ध अभ्यासाठी या दोन शहरावरुन विमान वाहतूक बंद केली आहे. अनेक देश अशा प्रकारे युद्ध अभ्यास करतात पण अशा प्रकारे विमानतळांना अधिक काळ बंद ठेवणे हे असामान्य आहे. भारतीय अधिकारी यावर लक्ष ठेवून आहेत. सध्या सीमेवर तणावाचं वातावरण आहे त्यामुळे प्रत्येक हालचालींवर जवान लक्ष ठेवून आहेत.


भारतीय हवाईदलाच्या एका अधिकाऱ्याचं म्हणणं आहे की, ही एक प्रतिबंध एयर कॉम्बॅट अभ्यासाचा भाग असू शकतो आम्ही सध्या त्यावर लक्ष ठेवून आहोत. एका आठवड्याआधीही पाकिस्तानने पीओकेवरुन आणि या दोन शहरांवरुन विमान वाहतूकीच बंदी घातली होती. यामुळे भारतातील विमान वाहतूकीवर परिणाम होणार नसल्याचं एअर कंट्रोल विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. भारतासह आशिया, युरोप आणि मध्यपूर्व भागांसाठी एअर ट्रॅफिक कॉरिडोरमध्ये पाकिस्तान येतो. पण आता दुसरा मार्गावरुन विमान वाहतूक केली जाणार आहे.