इस्लामाबाद :  जमात उद दावाचा म्होरक्या हाफीस सईद याला लाहोरमध्ये नजरबंद करण्यात आले. पाकिस्तान सरकार त्याच्या संघटनेबाबत खूप महत्त्वाचा निर्णय घेऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे हाफिज सईदच्या संघटनेला अजूनही पाकिस्तानने बॅन केलेले नाही. हाफिजच्या दहशतवादी कारवाया जगासमोर आल्या आहेत. 


काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी फूस लावण्याचे काम हाफीज करत असतो. तसेच तो देशाच्या सीमावर्ती भागात सक्रिय असतो. काश्मीरमध्ये ठार झालेल्या बुरहान वाणीच्या मृत्यूनंतर त्याची काश्मीरात अशांतता पसरविण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती.