नवी दिल्ली : पाकिस्तानने जवळपास त्यांच्या सगळ्याच एअरस्पेसवर विदेशातील कमर्शियल एयरलाइन्सचे उड्डाणं कमी केली आहेत. मागच्या सोमवारी 33,000 फुटपेक्षा कमी उंचीवरील उड्डाणं पाकिस्तानने कराची एअरस्पेसवर बंद केली आहेत. लाहोर एअरस्पेसमध्येही 29,000 फुटांपेक्षा कमी उंचीवरील उड्डाणे बंद करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानने एअरमॅन (NOTAM)ला या संबंधित नोटीस दिली आहे. या उड्डाणांना बंद करण्यासाठीचं कारण 'ऑपरेशनल' असल्याची माहिती दिली जात आहे. कराची एअरस्पेसवर ही बंदी एक आठवड्यासाठी घोषित करण्यात आली आहे. तर लाहोरमध्ये ही बंदी ३१ ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. इंडियन एअरलाइन्सचे कमांडर आणि इंटरनऍशनल रूट प्लानर यांनी म्हटलं आहे की, एअरस्पेसवर बंदीमुळे पाकिस्तानहून वेस्ट गल्फ देशांमध्ये जाणाऱ्या विमानांना उशीर होऊ शकतो.


एका कमांडरने म्हटसं की, एअरस्पेसवर लोवर-लेवल उड्डाणे रद्द करण्यात आली आहे कारण त्यांना त्यांच्या लष्करी विमानांच्या सरावात कोणतीही अडचण येऊ नये. भारतामुळे भारत ही चाल खेळत असल्याचं देखील बोलण्यात येतंय. पाकिस्तानसोबत वायु संबंध ठेवायचा की नाही यावर पंतप्रधान ऑफिसमध्ये चर्चा सुरु आहे. तर पाकिस्तानच्या विमानांना देखील भारतात प्रवेश द्यायचा की नाही यावर देखील चर्चा सुरु आहे. भारतातील विमानं पाकिस्तानमध्ये उड्डाण करत नाही.