नवी दिल्ली : पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरुच आहे. पाकिस्तान भारतीय लष्कराला उकसवण्याचं काम करतोय. आजही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं. दुसरीकडे पाकिस्तान लढाऊ विमानं सीमाभागात आणत आहे. भारतीय लष्करावर ते सतत लक्ष ठेवून आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीएसएफचे जवानांनी भारत-पाकिस्तान सीमेजवळ माणवरहित विमानांना पाहिलं आहे. बीएसएफने अशी शंका उपस्थित केली आहे की, कदाचित मानवरहित विमानांनी पाकिस्तान भारतावर लक्ष ठेऊन आहे. भारतीय लष्करावरही या विमानांनी लक्ष ठेवण्यात येत असल्याचं आता समोर येत आहे.


भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर वेस्टर्न फ्रंटवर 'तणाव' वाढला आहे. सर्व सुरक्षा यंत्रणा अलर्टमध्ये आहे. पश्चिम भागातील सीमेवर तणाव अधिक आहे. दुसरीकडे पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन आणि गोळीबार होत आहे तर दहशतवादी मोठ्या प्रमाणात सीमाभागातून घुसखोरीचा प्रयत्न करत आहे. सीमाभागात तणावाचं वातावरण तयार होतंय. दिल्लीसह अनेक राज्यांना हायअलर्टवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.