मुल्तान : पाकिस्तानच्या पंजाब राज्यातील एक महिलेने तिच्या बॉयफ्रेंडवर अॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना घडलीये. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉयफ्रेंडने लग्नास नकार दिल्याने या महिलेने हे कृत्य केलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोमिल माई असं या आरोपी महिलेचे नाव आहे. तिला चार मुलेही आहेत. मुल्तान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचे सदाकत अली या तरुणाशी
अफेयर सुरु होते. अलीचेही लग्न झालेय. 


अली बुधवारी रात्री त्या महिलेला भेटण्यासाठी गेला. यावेळी त्या महिलेने अलीला माझ्याशी लग्न कर असा हट्ट धरला. मात्र अलीने त्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या महिलेने त्याच्यावर अॅसिड फेकले. 


दरम्यान, अलीच्या पाठीवर हे अॅसिड पडल्याने चेहरा सुरक्षित राहिला. त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 


आरोपी महिलेला अटक करण्यात आली असून याप्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.