मनिला : भ्रष्टाचारी अधिका-यांना हेलिकॉप्टरमधून फेकून देऊन, अशी धमकी फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्ट यांनी दिलीय. तसंच ड्रगमाफियांनाही ठार करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही जर भ्रष्टाचार केलात तर हेलिकॉप्टरमधून फेकून देईन, याआधीही मी असं केलंय. आणि मी ही कारवाई पुन्हा करीन, अशी धमकी त्यांनी दिलीय. फिलिपाईनमध्ये एका चीनी माणसानं महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या केली होती. त्या बलात्का-याला आपण स्वतः हेलिकॉप्टरमधून फेकून दिल्याचं रॉड्रिगो यांनी सांगितलं.


फिलीपिन्सची राजधानी मनिलामध्ये नुकतीच सहा ड्रगमाफियांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे तब्बल 560 किलोंचे ड्रग्ज सापडले होते. या ड्रगमाफियांनाही स्वतः ठार करू अशी धमकी त्यांनी दिलीय.