ब्रसेल्स : ब्रसेल्समध्ये हजारो भारतीय समुदायासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधला. सरकार स्थापनेपासून केलेल्या विकास कामांचा पाढा मोदींनी वाचला. यावेळी मोदींनी ब्रसेल्समध्ये पाकिस्तानला टोला हाणला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जनधन योजना, वन रँक वन पेंशन योजनेचा उल्लेख त्यांनी केला. 2015 मध्ये कोळसा, वीज आणि दुधाचं देशात सर्वाधिक उत्पादन झाल्याचं त्यांनी सांगितलं. 


तर बांग्लादेश बरोबरचा सीमावाद सोडवला. पण काही शेजारी देश आहेत जे समजून घेत नाहीत, अशा शब्दात मोदींनी पाकिस्तानचं नाव न घेता टोला लगावला. 


संयुक्त राष्ट्रसंघानं अद्याप दहशतवादाची व्याख्या केली नाही, यावर चिंता व्यक्त करत कुठलाही धर्म दहशतवादाचा धडा शिकवत नाही, असं मोदींनी नमूद केलं. जगावर आर्थिक संकट आहे. अशा परिस्थितीत तरुणांचा देश असलेल्या भारत आशेचा किरण आहे, असंही मोदी म्हणालेत. 


भाषणातील ठळकबाबी
- पाच कोटी गरीब लोकांना गॅस कनेक्शन देण्यात येणार 
- माझ्या विनंतीवरुन ९० लाख लोकांनी गॅस अनुदान सोडले
- २०१५ मध्ये सर्वाधिक जास्त लोकांना गॅस सिलेंडर मिळाले  
- सर्वाधिक जास्त दुध उत्पादन २०१५ मध्ये झाले  
- २०१५ मध्ये सर्वाधिक जास्त वीज आणि कोळसा उत्पादन झाले 
- देशातील १८,००० गावांना वीज पुरवठा केला 
- आजच्या काळात शेतकऱ्यांना युरियासाठी रांगेत उभारावे लागत नाही 
- देश स्वातंत्र्य झाल्यानंतर सर्वाधिक युरियाचे उत्पादन २०१५ मध्ये झाले आहे
- सव्वा चार लाख शाळांमध्ये टॉयलेट बांधले
- मी स्वत:ला पंतप्रधान मानत नाही, तर सेवक मानतो.