गुन्हेगारांच्या शोधात ‘पोकेमॉन गो’
गेल्या काही दिवसांपासून पोकेमॉन गो या मोबाईल गेमने जगभरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अमेरिकन पोलिस मात्र या गेमचा उपयोग गुन्हेगार पकडण्यासाठी करणार आहेत.
व्हर्जिनीया : गेल्या काही दिवसांपासून पोकेमॉन गो या मोबाईल गेमने जगभरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अमेरिकन पोलिस मात्र या गेमचा उपयोग गुन्हेगार पकडण्यासाठी करणार आहेत.
व्हर्जिनियातील स्मिथफिल्ड पोलिस विभागाने पोकेमॉन योजना तयार केली आहे. यानुसार फरार गुन्हेगारांच्या नावाच्या यादीत पोकेमॉनच्या प्रतिमेचा समावेश करण्यात आला आहे.
हा गेम खेळणाऱ्या नागरिकांच्या मदतीने गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांच्या या नव्या योजनेनुसार एकही गुन्हेगार पकडला गेला नाही. पण एक गुन्हेगार पोकेमॉन खेळता खेळता पोलिस स्टेशनमध्ये आला, त्याला अटक करण्यात आली असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.