वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाउसमधील ओव्हल कार्यालयात पहिल्यांदा दिवा लावून दिवाळी साजरी केली आणि अशी आशा व्यक्त केली की येणाऱया पुढच्या नेत्यांनी देखील ही पंरपरा कायम ठेवावी. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२००९ मध्ये व्हाईट हाउसमध्ये पहिल्यादा दिवाळी साजरा करण्याचा मान मला मिळाला होता. ओबामा यांनी भारतीय आणि अमेरिकन अधिकाऱ्यांसोबत ही दिवाळी साजरी केली आणि फेसबूक पोस्टमध्ये याबाबत त्यांनी याचा उल्लेख केला आहे. २००९ मध्ये राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर हा गौरव मला प्राप्त झाला. मिशेल आणि मी हे कधीच विसरु शकत नाही. भारताच्या लोकांनी आमचं मोठ्या हृद्याने स्वागत केलं होतं. दिवाळीला मुंबईमध्ये आमच्यासोबत डान्स देखील केला होता.


व्हाईट हाउसच्या फेसबूक पेजवर त्यांनी म्हटलं आहे की, यावर्षी मला ओव्हल कार्यालयात पहिल्यांदा दिवा लावण्याचा मान मिळाला. हा दिवा या गोष्टीचं प्रतिक आहे की, प्रकाश नेहमीच अंधारावर विजय मिळवतो. ओबामांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. दीड लाख लोकांपेक्षा अधिक लोकांनी ती लाईक केली आहे. तर ४२ हजाराहून अधिकांनी त्याला शेअर केलं आहे.


ओबामांनी म्हटलं की, ओबामा परिवाराकडून मी तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना या दिवाळीत शांती आणि आनंदाचा शुभेच्छा देतो. अमेरिका आणि जगभरात जे ही लोकं हा प्रकाशाचा उत्सव साजरा करत आहे त्यांना सगळ्यांना शुभेच्छा. हिंदू, जैन, सिख आणि बौद्ध दिवा लावून प्रार्थना करतात. आपलं घर सजवतात आणि आपल्या लोकांचं स्वागत करतात. आम्ही मानतो की हे वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजयाचं प्रतिक आहे.