काठमांडू : नेपाळमधल्या 11 वर्षांच्या रमेश दार्जी या मुलाला एक वेगळाच आजार झाला आहे. या आजारामुळे रमेशचं शरीर दगडासारखं बनत चाललं आहे. जन्म झाल्यानंतर पंधरा दिवसानंतर रमेशची त्वचा दगडासारखी टणक व्हायला लागली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आजारामुळे रमेशचं शरीर दगडाच्या मूर्तीसारखं होतं चाललं आहे. 'इक्थीओसिस' असं या आजाराचं नाव आहे.  रमेश फक्त भूक लागली तर आणि टॉयलेटला लागली तरच बोलतो, अशी प्रतिक्रिया त्याच्या आई-वडिलांनी दिली आहे. रमेशचे आई-वडिल नेपाळमध्ये मजुरीचं काम करतात. 


रमेशला वाचवण्यासाठी ब्रिटनचा गायक जॉस स्टोनं पुढाकार घेतला आहे. जॉस स्टोननं रमेशसाठी एका कॉन्सर्टचं आयोजन केलं होतं. या कॉन्सर्टमधून 1,375 पाऊंड एवढी रक्कम गोळा झाली आहे.