बगदादीच्या घरात सापडलं स्विमिंग पूल आणि प्राणीसंग्रहालयही!
इसिसचा म्होरक्या आणि क्रूरकमा अबु बक्र अल बगदादी कसा राहात होता? असा प्रश्न आजवर अनेकांना पडला असेल.
लंडन : इसिसचा म्होरक्या आणि क्रूरकमा अबु बक्र अल बगदादी कसा राहात होता? असा प्रश्न आजवर अनेकांना पडला असेल.
बगदादीच्या भल्या मोठ्या मेन्शनमध्ये भलं मोठं खाजगी स्विमिंग पूल आहे. इतकंच नाही तर त्याचं खाजगी असं एक प्राणीसंग्रहालयही आहे. यामध्ये काही उंट आणि घोडेही सापडले. सिरीयातील सैन्यानं टाकलेल्या धाडीत हे उघड झालंय.
बगदादी ठार झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. परंतु, काहींच्या म्हणण्यानुसार, अजूनही बगदादी जिवंत असन तो इराकच्या मोसूल शहरात फिरतोय.