नवी दिल्ली :  एका अमेरिकन थिंक टँकने दावा केला आहे की रशिया पुढील ६० तासात पूर्व युरोपच्या दोन देशांवर ताबा मिळवू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थिंक टँकचे असेही म्हणणे आहे की, नाटो एस्टोनिया आणि लातवियाला योग्य प्रकारे सुरक्षा देऊ शकत नाही. सध्या क्रिमिया शहरावर रशियाने ताबा मिळविला आहे. या ठिकाणावर त्यांचे सैन्य शक्ती खूप मजबूत झाली आहे. 


डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार थिंक टँक रेंड फाउंडेशनने आपल्या रिपोर्टमध्ये दावा केला की, रशिया लातविया बॉर्डरवर दोन्ही बाजूंनी मोठे सैन्य पाठवू शकते. तर दुसरी बटालियन एस्टोनियामध्ये दाखल होऊन त्याची राजधानी ताल्लिनवर कब्जा करू शकते. 


रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, रशियाच्या सैन्याचा सामना लातविया किंवा नाटो सैनिक करू शकत नाही. रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले की नाटोची जमिनीवरील सैन्य रशियाचा सामना करू शकत नाही. रशियाकडे या वेळी मोठ्याप्रमाणात रणगाडे आहेत. दुसरीकडे नाटोच्या सैन्याला युद्ध अभ्यास करण्यास जागा नाही. 


१९९० मध्ये सोव्हिएत रशियाचे विभाजन झाले होते त्यावेळी एस्टोनिया, लातविया आणि लिथुआनिया सह अनेक देश युरोपियन युनियनमध्ये सामिल झाले होते. रशियाने आता आपल्या विभाजीत भागांवर कब्जा करण्यास सुरूवात केली आहे. या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात रशियन लोक राहतात.