बीजिंग : मानवाच्या शरीराचा एखादा खराब अवयव बदलून त्या व्यक्तीला जीवनदान देण्यासारखं चांगलं काम कोणतंही नाही. किडनी, यकृत आणि हृदयाच्या प्रत्यारोपणासंदर्भात आपण ऐकलंच असेल. मात्र मानवी डोक्याच्या प्रत्यारोपणाबाबत तुम्ही कधीही ऐकलं नसेल. मात्र आता जगातलं पहिलंवहिलं हेड ट्रान्सप्लांट होणार आहे.. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- जगातलं पहिलं मानवी हेड ट्रान्सप्लांट


- 80 डॉक्टरांची टीम करणार ऑपरेशन


- ट्रान्सप्लांट अपयशी झाल्यास डॉक्टरांवर हत्येचा खटला


- किडनी-यकृताचं प्रत्यारोपण तुम्ही ऐकलं असणार


- हृदय प्रत्यारोपणाची ही माहिती तुम्हाला असणार


- मात्र एखाद्या मानवाच्या डोक्याचं प्रत्यारोपण झाल्याचं कधी ऐकलंय का ?


जगात पहिल्यांदाच मानवाच्या डोक्याचं प्रत्यारोपण होणार आहे. त्याचं काऊंटडाऊन सुरु झालंय. कोणत्याही तांत्रिक अडचणी आल्या नाही तर 2017च्या सुरुवातीला हा प्रयोग होणार आहे. 31 वर्षीय व्हॅलेरी स्पिरीदिनोव याचं ट्रान्सप्लांट करण्यात येईल.


रशियन कॉम्प्युटर तज्ज्ञ व्हॅलेरी स्पिरीदिनोव याला वर्डनिग-हॉफमैन नावाचा आजार आहे. हा एक अनुवांशिक आजार असून त्यामुळं जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो.. डॉक्टरांच्या दाव्यानुसार स्पिरीदिनोव यांचा कधीही मृत्यू होऊ शकतो..


चीन, इटलीमधील प्रत्यारोपण तज्ज्ञ व्हॅलेरी स्पिरीदिनोव याच्यावर हा डोकं प्रत्यारोपणाचा प्रयोग करतील. मानवी डोक्याच्या प्रत्यारोपणाचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास अनेक असाध्य आजारांवर उपचार शक्य होतील. मात्र हा प्रयोग फसला तर डॉक्टरांवर हत्येचा खटला चालणार आहे. 


बीजिंगमध्ये हारबिन मेडिकल युनिव्हर्सिटीशी संबंधित 51 वर्षीय सर्जियो कानावेरो तसंच अमेरिकेतील चीनी सर्जन 55 वर्षीय रेन झियोपिंग आणि 80 डॉक्टरांची टीम हे प्रत्यारोपण करणार आहे. या ऑपरेशनसाठी या दोघांनाही विशेष मशिन्स बनवाव्या लागणार असून सर्जरीची नवी पद्धत शोधावी लागणार आहे. 


हे ऑपरेशन चीनमध्ये होण्याची शक्यता असून अमेरिका किंवा युरोपमध्ये या डोक्याच्या प्रत्यारोपणाला मंजुरी मिळणार नसल्याचं बोललं जातंय.