विमान कोसळल्यानं 62 ठार
रशियाच्या दक्षिण भागामध्ये विमान अपघातातत 62 जणांचा मृत्यू झाला आहे.
मॉस्को: रशियाच्या दक्षिण भागामध्ये विमान अपघातातत 62 जणांचा मृत्यू झाला आहे. रोस्तोव्ह-ऑन-डॉन विमानतळावर हे विमान उतरत असताना हे बोईंग 737-800 हे विमान कोसळलं.
या विमानामध्ये असलेले सगळे प्रवासी आणि क्रु मेंबर्स या अपघातात ठार झाल्याची माहिती मिळत आहे. धावपट्टीवर उतरण्यासाठी विमानानं पहिला प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला, त्यानंतर दुसऱ्यांदा विमान उतरवत असताना हा अपघात झाला.
विमान कोसळल्यानंतर दुर्घटनास्थळी अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथक दाखल झालं आहे. या विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतरच अपघाताच खरं कारण समजण्यास मदत होईल.