पनामा पेपर्सच्या दुसऱ्या यादीत नेते आणि खेळाडूंची नावे
`पनामा पेपर्स` नावाच्या घोटाळ्यात आता राजकीय नेते आणि खेळाडूंची नावे आली आहेत. ही दुसरी यादी आहे.
नवी दिल्ली : 'पनामा पेपर्स' नावाच्या घोटाळ्यात आता राजकीय नेते आणि खेळाडूंची नावे आली आहेत. ही दुसरी यादी आहे. पहिल्या यादीत बॉलिवूडमधील दिग्गज व्यक्तिमत्व अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, तर उद्योगपती गौतम अदानी यांचे भाऊ विनोद अदानी, डीएलएफचे मालक के पी सिंग, मृत डॉन इक्बाल मिर्ची ही नावं चर्चेत आली आहेत.
जगभरातील सर्वच देशांच्या माध्यमांत कालपासून या 'पनामा पेपर्स'ची चर्चा आहे. भारतात या घोटाळ्यामुळे बॉलिवूडमधील दिग्गज व्यक्तिमत्व यांची नावे चर्चेत आली आहेत. आता तर राजकीय नेते, इंडस्ट्रियालिस्ट्स, सराफा व्यावसायिक आणि क्रिकेटर यांचीही नाव असल्याचे पुढे आले आहे.
दुसऱ्या यादीत माजी क्रिकेटपटू अशोक मल्होत्रा यांचे नाव आहे. पनामा लॉ फर्मची १.१५ कोटी रुपये टॅक्स डॉक्युमेंट्स लीक झालेत.
दुसऱ्या यादीत अश्विनी कुमार मेहरा, अश्विनी कुमार यांची नावे आहेत. ते मेहरासंस ज्वलर्सचे मालक आहेत. यात त्यांची दोन मुलेही भागिदार आहेत. परदेशात अश्विनीच्या नावे ७ कंपनी नोंदनीकृत आहेत.
अनुराग केजरीवाल - अनुराग हे लोक सत्ता पार्टीचे दिल्ली अध्यक्ष आहेत. २०१४मध्ये लोकसभा निवडणुकीच्यावेळी स्टिंग पुढे आले. त्यानंतर त्यांना पार्टीतून काढून टाकण्यात आले. त्यांच्यानावर तीन कंपनी आणि दोन संस्था असल्याचे पुढे आले.
गौतम आणि करण थापर- चार्लवूड फाऊंडेशन आणि निकोम इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या नावाच्या दोन कंपनी नोंदणीकृत असल्याचे पनामात म्हटलेय आहे. गौतम याने काका ललित मोहन थापर यांच्यासोबत बलारपूर इंडस्ट्रीज लिमिटेड संबंधीत आहेत.
सतीश गोविंग समतानी, विश्लव बहादूर आणि हरिष समतानी हे कुटुंब रेडीमेड गारमेंट्सच्या व्यवसाय करतात. बहादूर लखनऊचे रहिवासी असून ते सध्या बंगळुरुत वास्तव्य करीत आहेत. त्यांच्या ब्रिटीशस्थित आयलॅंड्समध्ये दोन कंपनी रजिस्टर्ड आहेत.
गौदम सिन्गल हे इन्व्हेस्ट मॅनेजमेंट आणि आयटी कंसल्टेंट आहेत. याशिवाय त्यांची कंपनीही आहे. ती सेक्टर्समध्ये काम करत आहेत. त्याशिवाय ब्रिटीशस्थित आयलॅंड्समध्ये जेफ मोर्गन कॅपिटल लिमिटेड ही रजिस्टर्ड आहे.
प्रभाष संकलेचा हे मध्य प्रदेशमधील सरकारी नोकर आहे. पत्नीच्या निधनानंतर ते इंदौरमध्ये राहत आहेत. त्यांच्या नावावर लोटस होराईजन एसए नावाची कंपनी आहे. ही कंपनी पनामातून ऑपरेट होत होती.
विनोद रामचंद्र जाधव हे सावा हेल्थकेअर नावाची कंपनी चालवतात. याचे युनिट अहमदनगर आणि बंगळुरुत आहे. यांच्या नावावर काही कंपन्या आहेत. त्यांच्या नावावरील कंपन्या या ब्रिटीशस्थित आयलॅंड्समध्ये रजिस्टर्ड आहेत.
अशोक मल्होत्रा हे इंडियन क्रिकेट टीम व्यवस्थापनमध्ये सहभागी होती. ते कोलकाता क्रिकेट अकादमी चालवात. त्यांच्यानावावर E&P Onlookers Limited ही कंपनी आहे. ती ब्रिटीशस्थित आयलॅंड्समध्ये रजिस्टर्ड आहेत. अशोक हे बंगाल आणि टीम इंडियाचे कोचही राहिले आहेत.