बीजिंग : चीनमधला वाघाचा हल्ला करतानाचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. सफारी पार्कमध्ये ही महिला तिच्या गाडीतून खाली उतरली, त्याचवेळी तिकडे वाघ आला आणि तो या महिलेला फरफटत घेऊन गेला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीजिंगमधल्या बडलिंग वाईल्डलाईफ पार्कमध्ये ही घटना घडली आहे. वाघाच्या या हल्ल्याचा हा  थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पार्कमधल्या कर्मचाऱ्यांनी या महिलेला वाचवण्याचाही प्रयत्न केला, पण त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. वाघानं केलेल्या या हल्ल्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे.