न्यूयॉर्क: अमेरिकेत भारतीयंवर हल्ल्यांचं सत्र सुरुच आहे. शुक्रवारी वॉशिंग्टनमध्ये 39 वर्षीय शीख तरुणावर हल्ला केल्याची घटना घडलीये. मास्क लावलेल्या हल्लेखोरानं त्याच्यावर गोळीबार करत तुमच्या देशात परत जा अशी धमकी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेनंतर अमेरिकेत रहाणा-या भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आलाय. वॉशिंग्टनमधील कँटमध्ये रहाणारा 39 वर्षीय शीख तरुण घराबाहेर गाडीचं काम करत होता. यादरम्यान मास्क लावलेल्या एका तरुणानं त्याच्यावर अचानक गोळीबार केला आणि धमकी देऊन घटनास्थाळावरुन पसार झाला.


या हल्ल्यात शीख तरुण जखमी झाला असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.. यातील हल्लेखोराची अद्याप ओळख पटलेली नाही. या घटनेची गंभीर दखल घेतलू असून आरोपीचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांकडून मिळतीये.