ब्रिटन जनमत चाचणीचा परिणाम शेअर बाजारावर, रुपया घसरला
ब्रिटनच्या नागरिकांनी १९७३ पासून सुरू झालेल्या युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी जनमत चाचणीच्या निम्म्याहून अधिक मतदारांनी युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या बाजूनं मतं दिलीत. तर जगभरातील शेअर बाजारावर याचा परिनाम दिसून येत आहे.
लंडन : ब्रिटनच्या नागरिकांनी १९७३ पासून सुरू झालेल्या युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी जनमत चाचणीच्या निम्म्याहून अधिक मतदारांनी युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या बाजूनं मतं दिलीत. तर जगभरातील शेअर बाजारावर याचा परिनाम दिसून येत आहे.
युनियनमधील राष्ट्रांची संख्या
या नव्या निर्णयामुळे आता युरोपियन युनियनमधल्या राष्ट्रांची संख्या २८ वरून २७ होणार हे जवळपास निश्चित झालंय. ब्रिटीश जनतेनं घेतलेल्या या निर्णयामुळे जगभरातल्या शेअर आणि चलन बाजारात मोठी पडझड बघयाला मिळतेय.
ब्रिटीश चलनाची तीस वर्षात नीचांकी
भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स १००० अंकांनी आपटलाय. तर निफ्टीही तीनशेहून अधिक अंकांनी कोसळलाय. २००८च्या मंदीतून ब्रिटीश अर्थव्यवस्था सरावरलेली नसताना आलेल्या या निकालामुळे ब्रिटीश चलन असेला स्टर्लिंग पाऊंडसुद्धा तीस वर्षातल्या नीचांकी स्तरावर आला आहे.
रुपया घसरला
तर भारताचा रुपया डॉलरच्या तुलनेत आणखी घसरल्यानं एका डॉलरचा भाव ६८ रुपये २० पैसे झाला आहे. रुपयात अचानक आलेली ही घसरण थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं हस्तक्षेप केल्याची माहिती पीटीआयनं दिलीय. एकूण जगभरातल्या बाजारात मोठा भूकंप आलाय.