लंडन : ब्रिटनच्या रस्त्यावर मंगळवारी तंत्रज्ञानाचा आणखी एक नवा अध्याय प्रत्यक्षात येण्याच्या दृष्टीनं पहिलं यशस्वी पाऊल पडले. मिल्टन कीन्स या दक्षिण ब्रिटनमधल्या शहरात प्रथमच चालक विरहित कारचा हा प्रयोग यशस्वी करण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 2020पर्यंत या गाड्या रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ताशी 8 किलोमीटर वेगानं या कारनं संपूर्ण शहरात फेरफटका मारला.  ही कार वीजेवर चालणारी असून, त्यात एकावेळी दोन प्रवासी बसू शकतात. या कारला चालकाची गरज नाही.


तसेच या कारचं स्ट्रिअरींग रडारद्वारे नियंत्रित करण्यात येतं. कारला विविधप्रकारचे सेन्सर लावण्यात आले आहेत. त्यांच्या मदतीनं ही कार योग्य ठिकाणी थांबते... जगातले सगळे महत्वाचे कार मॅन्यूफॅक्चर्स सध्या चालकविरहित कार बनवण्याचे कसोशिनं प्रयत्न करत आहेत. त्या दृष्टीनं हे अत्यंत महत्वाचं पाऊल मानले जात आहे.