न्यूयॉर्क : भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आज संयुक्त राष्ट्र संघाच्या समिटमध्ये भाषण करणार आहेत. यामध्ये सुषमा स्वराज कांगावाखोर पाकिस्तानचा बुरखा फाडणार असल्याचं मानलं जातंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उरी हल्ल्यातील पाकिस्तानचा सहभाग संयुक्त राष्ट्र संघाच्या मंचावरुन भारत जागतिक पटलावर उघड करु शकतो. नुकतेच पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काश्मिरमधील परीस्थितीची प्रतिक्रीया म्हणून उरी हल्ला झाल्याचं म्हटलं होतं. 


शरीफ यांच्या या उद्दाम विधानांचा सुषमा स्वराज खरपूस समाचार घेतील अशी अटकळ आहे. पाकच्या दहशतवादी कारवायांचे सबळ पुरावे संयुक्त राष्ट्रसमोर मांडले जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तानला जागतिक पटलावर एकटं पाडण्याची रणनिती यशस्वीपणे अमलात आणण्याचा प्रयत्न भारताकडून केला जाणार आहे.