नवी दिल्ली : सीरिया आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धात भयंकर आरोपांना तोंड देतानाच रशियाला धक्का बसलाय. रशियाला संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून (UNHRC) हद्दपार करण्यात आलंय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संयुक्त राष्ट्र महासभेनं जिनिव्हास्थित संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या 14 सदस्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान घेतलं होतं. 193 सदस्यीय महासभेनं मानवाधिकार परिषदेसाठी गुप्त मतदानाद्वारे 14 राष्ट्रांची निवड केली होती. 
   
संयुक्त राष्ट्र संघटना ही संस्था संपूर्ण जगात सर्व मानव अधिकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी जबाबदार आहे. रशियाला दुसऱ्यांदा या संघटनेचं सदस्यत्व पटकावयाचं होतं. परंतु, मतदान कमी पडल्यामुळे रशियाचं हे स्वप्न भंगलंय. 


ब्राझील, चीन, क्रोएशिया, क्युबा, इजिप्त, हंगेरी, इराक, जपान, रवांडा, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, ट्युनिशिया, ब्रिटन आणि अमेरिकेची 1 जानेवारी 2017 पासून पुढच्या तीन वर्षांसाठी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचं सदस्य म्हणून निवड करण्यात आलीय. 
 
भारत 47 सदस्यीय मानवाधिकार समितीचा सदस्य आहे आणि त्याचा कार्यकाल 2017 मध्ये संपुष्टात येईल.