नवी दिल्ली : अमेरिकेत टेक्सासमध्ये राहणाऱ्या ११ वर्षांच्या एका चिमुरडीनं आपल्या कौशल्यानं तब्बल ७० करोड रुपये कमावलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिकाइला उल्मेर असं या ११ वर्षांच्या मुलीचं नाव आहे. १.१० करोड डॉलरची एक डील तिनं नुकतीच साईन केलीय. '५५ होल फूड स्टोर्स'सोबत तिनं आपल्या लेमनेड (लिंबू पाणी) च्या ब्रँडच्या विक्रीसाठी ही डील केलीय. 


मिकाइला

'बी स्वीट' नावाचं हे पेय आता टेक्सास, ओकलाहोमा, अरकंसास आणि लुइसियानामधल्या स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. 


मिकाइलानं 'एबीसी टीव्ही'च्या 'शार्क टँक' कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात नव्या बिझनेस आयडियाजच्या साहाय्यानं पैसे जिंकण्याची संधी मिळते. 


गूगलच्या 'डेअर टू बी डिजिटल कॅम्पेन'मधून मिकाइलानं या कार्यक्रमानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनाही आपल्या लेमनेडची चव चाखायला लावली. मिकाइलानं या लिंबू पेयात धने, जवस आणि मधाचा वापर केलाय.