१३ वर्षाच्या विद्यार्थ्यापासून गर्भवती झाली शिक्षिका
अमेरिकेतील टेक्सासमध्ये पुन्हा एकदा शिक्षिका आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासली आहे. शाळेतील शिक्षिकेचे तिच्या विद्यार्थ्यासोबत अनैतिक संबंध होते. जेव्हा याबाबतचा खुलासा झाला तेव्हा अनेकांना धक्का बसला.
टेक्सास : अमेरिकेतील टेक्सासमध्ये पुन्हा एकदा शिक्षिका आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासली आहे. शाळेतील शिक्षिकेचे तिच्या विद्यार्थ्यासोबत अनैतिक संबंध होते. जेव्हा याबाबतचा खुलासा झाला तेव्हा अनेकांना धक्का बसला.
शिक्षिका ही मागील काही महिन्यांपासून विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करत होती. विद्यार्थ्यासोबत असलेल्या या अनैतिक संबंधामुळे ही शिक्षिका गर्भवती झाली. या शिक्षिकेचं म्हणणं आहे की हे सगळं मुलाच्या कुटुंबांच्या सहमतीने झालं आहे.
शिक्षिका ही एका समर कॅम्पमध्ये या विद्यार्थ्याला भेटली होती. ती या विद्यार्थ्यासोबत फ्लर्ट करत होती. त्यानंतर त्याला घरी सोडण्याच्या बहाण्याने ती त्याच्या घरी आली आणि घरात कोणी नसतांना त्यांनी शारिरीक संबंध बनवले. सध्या पोलीस या शिक्षिकेच्या शोधात आहे आणि तिच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.