कुलभूषण जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थगिती
पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिलीय.
लंडन : पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिलीय.
नेदरलँडच्या हेगमध्ये असलेल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिलीय. भारताने पाकिस्तानच्या मिलिट्री कोर्टाच्या निर्णयाविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात 8 मेला याचिका दाखल केली होती.
पाकिस्तानने विएना संधीचं उल्लंघन केल्याचा आरोप भारताने आंतरराष्ट्रीय कोर्टात केला. तर कुलभूषण यांना त्यांची बाजू मांडू दिली नाही. तर भारतीय उच्चायोग अधिका-यांशी भेटण्यासही नकार दिला होता. आता आंतरराष्ट्रीय कोर्टान फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिलीय.
आता याबाबत पाकिस्तानकडून कोणतंही वक्तव्य आलेलं नाही. या निर्णयामुळे जाधव यांच्या मुक्ततेसाठी पाकिस्तानवर दबाव आणणं आता शक्य होणार आहे. कुलभूषण जाधव भारतीय हेर असल्याच्या पाकिस्तानच्या आरोपाचा, भारत सरकारनं पहिल्यापासूनच इन्कार केला होता.
कुलभूषण जाधव माजी भारतीय नौदल अधिकारी असून, नोकरी सोडल्यानंतर जाधव यांचा भारत सरकार तसंच भारतीय नौदलाची काहीही संबंध नसल्याचं भारत सरकारनं आधीच स्पष्ट केलंय.