मुंबई : जगातली अर्ध्याहून अधिक संपत्ती ही फक्त आठ जणांकडे असल्याचा धक्कादायक अहवाल ऑक्सफेम या संस्थेनं केला आहे. या आठ जणांपैकी अमेरिकेतले 6, स्पेन आणि मॅक्सिकोतल्या प्रत्येकी एका उद्योगपतींचा समावेश आहे. तर भारतातली परिस्थितीही फारशी वेगळी नसल्याचं या अहवालात समोर आलं आहे. भारतातल्या 57 जणांची संपत्ती ही देशातल्या 70 टक्के नागरिकांच्या बरोबरची आहे.


हे आहेत जगातले 8 कुबेर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिल गेट्स- मायक्रोसॉफ्ट संस्थापक- 5 लाख कोटी रुपये


अमांसियो ऑर्टेगा- इंडिटेक्स संस्थापक- 4.5 लाख कोटी रुपये


वॉरेन बफेट- गुंतवणूकदार- 4.14 लाख कोटी रुपये


कार्लोस स्लिम- मेक्सिकन उद्योगपती- 3.6 लाख कोटी रुपये


जेफ बेजॉस- अॅमेझॉन संस्थापक- 3 लाख कोटी रुपये


मार्क झुकरबर्ग- फेसबूक संस्थापक- 2.95 लाख कोटी रुपये


लॅरी एलिसन- ओरॅकल कॉर्प- 2.9 लाख कोटी


मायकल ब्लूमबर्ग- न्यूयॉर्कचे माजी महापौर- 2.7 लाख कोटी रुपये