मुंबई : हे आहे जगातील सर्वात अवाढव्य विमान. हे विमान प्रवासी वाहतुकीसाठी नसून कार्गोवहनासाठी आहे. 'अँटोव अॅन - २२५ मायरा' असं या विमानाचं नाव आहे. युक्रेनिअन भाषेत 'मायरा' या शब्दाचा अर्थ 'स्वप्नवत' असा होतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोव्हिएत महासंघाच्या अँटोव डिझाईन ब्यूरोने १९८० साली या महाकाय विमानाची निर्मिती केली. १९८८ साली पहिल्यांदा हे विमान हवेत झेपावलं आणि इतिहास घडला. सोव्हियत महासंघाच्या पाडावानंतर हे विमान युक्रेनच्या ताब्यात आलं. 


६४० टन इतकं वजन असलेलं हे विमान मानवी इतिहासातील सर्वात जास्त वजनाचं विमान आहे. या विमानाला चक्क सहा टर्बोफॅन इंजिन्स आहेत. इतर कोणत्याही विमानापेक्षा या विमानाचे पंख आकाराने सरळ आहेत. सध्या जगभरात अशाप्रकारचं हे एकमेव विमान आहे.