पॅरिस : 'उच्च अध्यात्मिक पातळी' गाठण्यासाठी एक हजार युवतींशी सेक्स करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका भोंदू योगगुरूला पॅरिसमध्ये अटक करण्यात आली आहे. ग्रेगोरियन बिवोलारू असं त्याचं नाव असून तो रोमानियाचा नागरिक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक हजार तरुणींसोबत शरीरसंबंध प्रस्थापित केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. ६४ वर्षे वय असलेल्या ग्रेगोरियनला २०१३ साली इंग्लंडमधील एका कोर्टाने एका अल्पवयीन मुलीशी संभोग करण्याच्या आरोपासाठी सहा वर्षांची शिक्षा सुनावली होती. पण, हे प्रकरण प्रकाशात येताच तो फरार झाला होता. 


यो योगगुरूच्या आश्रमात एक हजार जण योग शिकण्यासाठी येत होते. त्याच्यावर सेक्स रॅकेट चालवल्याचे अनेक आरोप आजवर लावण्यात आले आहेत. सामूहिक सेक्स करण्याचेही अनेक आरोप त्याच्यावर लावले गेले आहेत. योगाचे तांत्रिक ज्ञान देण्याच्या बदल्यात तो १५ वर्षांपेक्षा कमी वयांच्या मुलींशी संभोग करण्याची मागणी करण्याचा आरोपही त्याच्यावर आहे. 


१९९० च्या दशकात त्याने योगगुरू म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. सध्या त्याला फ्रान्समध्येच ठेवले जाणार आहे. पण, त्याला रोमानियाला सोपवण्याच्या निर्णयावर फ्रान्स सरकार विचार करत आहे. 


त्याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या तरुणीच्या मते तो काही मुलींना आपल्या फ्लॅटवर काही दिवस ठेवत असे आणि त्यांच्यासोबत संबंध प्रस्थापित करुन पुन्हा त्यांच्या जागी दुसऱ्या काही तरुणींना आणत असे.