तुर्की : तुर्कस्तानात आत्मघाती हल्ल्यात  ३० जण ठार झालेत तर  ९० जण जखमी आहेत. तुर्कस्तानातील गजनीटेप शहरातील विवाहसोहळ्यात हा आत्मघाती हल्ला झाला. तुर्कस्तान सरकारने हा दहशतवादीवादी हल्ला असल्याचे म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गजनीटेप शहरातील एका विवाह सोहळ्यात दहशतवाद्यांनी आत्मघाती बॉम्बस्फोट केले. या बॉम्बस्फोटात ३० जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. या हल्ल्यामागे नेमका कोणाचा हात आहे अजून कळालेलं नाही.


अजून कुठल्याही अतिरेकी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचं समोर आलेलं नाही, मात्र आयसीसचा हात असल्याचा दावा तुर्कस्तान सरकारने केला आहे.