व्हिएतनाम : जुळी मुले झाली, पण त्या दोघांचे वडील हे वेगवेगळे ऐकायला विचित्र वाटतं ना... हे वैद्यकीय दृष्ट्याही कसं शक्य आहे असा प्रश्न तुम्हांला पडला असेल....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण हे शक्य झाले व्हिएतनाम येथील उत्तर भागात असलेल्या होआ बिन्थ प्रांतात. येथील जुळ्या मुलांपैकी एकाचे जाड आणि कुरळे केस आहेत तर दुसऱ्या मुलाचे केस पातळ आणि सरळ आहेत. 


हॉस्पिटलने आपले एक मूल बदलले आहे, असे या मुलांच्या आई आणि वडिलांनी वाटत होते, त्यामुळे त्यांनी  त्याची DNA चाचणी केली. त्यात ही धक्कादायक बाब समोर आल्याचे व्हिएत नाम न्यूजने आपल्या वृत्तात म्हटले आहे. 


ही DNA टेस्ट हानोईच्या सेंटरमध्ये करण्यात आले. त्यात निष्पन्न झाले की या दोघांची आई एक आहे. तर ३४ वर्षीय वडिलांना समजले की या दोघांपैकी केवळ एकच मुलगा आपला आहे. 


बिपॅट्रनल मुलं 


बिपॅट्रनल मुलं ही खूप दुर्मिळ घटना आहे. अशा प्रकारे ही पहिला घटना आहे जी व्हिएतनाममध्ये घडली आहे. 


या संदर्भात डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने दोन वेळा वेगवेगळ्या व्यक्तींशी सेक्स केल्यास बिपॅट्रनल जुळी मुलं होऊ शकतात. 


कसं झालं शक्य


महिलेच्या गर्भातील अंडी ही १२ ते ४८ तास जगतात. तर पुरूषाचे शुक्राणू हे १० दिवस जगू शकतात. त्यामुळे या महिलेने दोन व्यक्तींशी संभोग केल्यामुळे दोन अंडी फलीत झाली आणि त्यातून दोन जुळे मुले जन्माला आली.