टीसीएसला जोरदार झटका, कोट्यवधींचा दंड भरावा लागणार?
`ट्रेड सीक्रेट व्हायलेशन`साठी (व्यापार माहिती उल्लंघन) टाटा ग्रुपच्या दोन कंपन्यांना जोरदार झटका बसलाय.
नवी दिल्ली : 'ट्रेड सीक्रेट व्हायलेशन'साठी (व्यापार माहिती उल्लंघन) टाटा ग्रुपच्या दोन कंपन्यांना जोरदार झटका बसलाय.
'टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस' आणि 'टाटा अमेरिका इंटरनॅशनल कॉर्प'ला अमेरिकेच्या एका न्यायालयानं दिलेल्या एका निर्णयामुळे हादरा बसलाय.
अमेरिकेच्या एका कोर्टाच्या न्यायाधीशांनी दोन्ही कंपन्यांवर 'इपिक सिस्टम'चं सॉफ्टवेअर चोरण्याचा आरोप सिद्ध झाल्याचं म्हटलंय. यासाठी या कंपन्यांवर तब्बल ९४० दशलक्ष डॉलरचा (६२०० करोड रुपये) दंड ठोठावलाय.
'इपिक सिस्टम'नं टाटाच्या टीसीएस आणि 'टाटा अमेरिका इंटरनॅशनल कॉर्प'वर चलाखी करून सॉफ्टवेअर चोरण्याचा आरोप केला होता. टीसीएसनं आपल्या ग्राहकांकडून कन्सल्टन्सी दरम्यान हा डाटा घेतल्याचं इपिकचं म्हणणं आहे.
दरम्यान, टीसीएसनं मात्र या आरोपांना नकार दिलाय. आपण कोणत्याही प्रकारे नियमांचं उल्लंघन केलं नाही, आणि हे सिद्ध करण्यासाठी आपण वरच्या कोर्टात जाऊ, अशी भूमिका टीसीएसनं घेतलीय.