नवी दिल्ली : पठाणकोट हल्ल्याप्रकरणी अमेरेकेने भारताला पाकिस्तानाविरोधात ठोस पुरावे सादर केले आहेत. अमेरिकेने NIAला 1हजार पानांचं डोजीयर दिले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या डोजीयरमध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हस्तक काशिफ जान आणि चार फिदाईन अतिरेक्यांमध्ये झालेलं संभाषणाचं रेकॉर्डींग नमुद करण्यात आले आहे.  


हल्ल्यातील आत्मघाती दहशतवादी नासिर हुसैन, अबू बकर, उमर फारुक, आणि अब्दुल कयूम तब्बल ८० तास  पाकिस्तानत बसलेल्या आपल्या हस्तकाच्या संपर्कात होते. या सर्व संभाषणाची विस्तृत माहिती अमेरिकेने दिलेल्या डोजीयरमध्ये नमूद करण्यात आली आहे. या डोजीयरमुळे पाकिस्तानचा पुन्हा पर्दाफाश झाला आहे.