वॉशिंग्टन : हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील पहिल्या जाहीर चर्चेला सुरुवात झाली. यात हिलरी यांनी बाजी मारल्याचे दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोनाल्ड ट्रम्प यांनी महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत त्यांचा अपमान केला आहे, अशी सुरुवात हिलरी क्लिंटन यांनी केली. तर हिलरी क्लिंटन जिंकल्यास माझं समर्थन, असेल असे मत डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले.


अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या शर्यतीसाठी डॉनल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांच्यातल्या पहिल्या प्रेसिडेंशिअल ड़िबेटला न्यूयॉर्कमध्ये हिलरींची सरशी झाल्याचे चित्र दिसून आले.


डिबेटच्या सुरूवातीला अमेरिकन अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी करांचे दर 35 टक्क्यांवरून थेट 15 टक्के आणण्याच्या घोषणेचा पुनरुच्चार डोनाल्ड ट्रम यांनी केला. तर शिक्षण आणि पायभूत सुविधांवर सर्वाधिक गुंतवणूक करण्याची हमी क्लिंटन यांनी दिली. 


पण खरा वाद पेटला तो वर्णभेदाच्या मुद्द्यावरून. डोनाल्ड ट्रम्प हे वर्णभेदी मनोवृत्तीचे असल्याचा सनसनाटी आरोप हिलरी क्लिंटन केल्यानंतर ट्रम्प यांची चांगलीच कोंडी झाली. स्वतःचा इतिहास चांगला नसल्याने ट्रम्प यांना उत्तर देणे कठीण झाले. त्याचप्रमाणे हिलरी क्लिंटन यांनी ट्रम्पच्या निर्णय क्षमेतवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.


एखाद्या विरोधी ट्विटमुळे जो माणूस विचलित होतो त्याच्या हाती अणू अस्त्रांच्या साठ्याची मालकी नसावी, असा युक्तीवाद हिलरी क्लिंटन यांनी केला. त्यावर माझी निर्णय क्षमता आणि मानसिक स्थैर्य दोन्ही उत्तम असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.