कारकस : केंद्र सरकारकडून देशात नोटाबंदी जाहीर केल्यानंतर व्हेनेझुएलानेही या पावलावर पाऊल ठेवत नोटाबंदी जाहीर केली होती. मात्र लोकांच्या प्रचंड विरोधामुळे अवघ्या आठवड्याभरात हा निर्णय मागे घेण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस यांनी नोटाबंदीचा निर्णय फसण्यामागे विदेशी 
शक्तींचा हात असल्याचे म्हटलेय. राष्ट्राध्यक्ष निकोलस यांनी 12 डिसेंबरला चलनातील सर्वात मोठी 100 बोलिवरची नोट बाद कऱण्याचा निर्णय़ घेतला होता. त्याच्याऐवजी 500, 2000 आणि 20,000 बोलिवरच्या नव्या नोटा चलनात आणल्या होत्या.


मात्र नोटबंदीच्या या निर्णयानंतर व्हेनेझुएलामध्ये मोठा जनक्षोभ उसळला . लोकांनी केलेल्या कडाडून विरोधामुळे आठवड्याभरातच त्यांना माघार घ्यावी लागली. 


पंतप्रधान मोदींनी 8 डिसेंबरला 500 आणि 1000च्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर चारच दिवसांनी व्हेनेझुएला देशानेही नोटाबंदी जाहीर केली होती.