लंडन : कर्जबुडव्या विजय माल्ल्याला लंडनमध्ये अटक करण्यात आल्यानंतर त्याला काही वेळातच जामीन मंजूर झाला. यानंतर विजय माल्ल्यानं मीडियाला टार्गेट केलं आहे. प्रत्यार्पणाच्या याचिकेवर आज सुनावणीला सुरुवात झाली आहे. पण मीडियानं याचा गाजावाजा केल्याचं ट्विट माल्ल्यानं केलं आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माल्यावर भारतीय बँकांचं 9000 करोड सहीत एकूण 12,000 करोड रुपयांहून अधिक कर्ज बुडवल्याचा आरोप आहे. माल्ल्याला ताब्यात घेण्यासाठी सीबीआय टीम लंडनमध्ये जाणार आहे. परंतु, जामीन मिळाल्यानंतर त्याच्या भारताकडे होणाऱ्या प्रत्यार्पणावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय.


मार्च 2016 रोजी कर्जबुडव्या माल्या ब्रिटनमध्ये पळून गेला होता. जानेवारी 2017 मध्ये सीबीआयनं त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढलं होतं. भारत सरकारनं 8 फेब्रुवारी रोजी माल्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटन सरकारकडे अर्ज दाखल केला होता. त्यानंतर, 24 मार्च रोजी माल्याला भारताकडे प्रत्यर्पण करण्याची भारताची मागणी ब्रिटन सरकारनं मंजूर केली होती.