जेरुसलेम : हेथिर लार्सन  जगप्रसिद्ध रोप वॉकरनी काल जेरूसलेमच्या दोन ऐतिहासिक टॉवर्समधलं २० मीटर अंतर दोरीवरून चालून पूर्ण केलं. कुठल्याही आधाराशिवाय हेथिर लार्सन दोरीवरून चालत गेल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेरुसलेमचा तत्कालीन राजा हेरॉडनं दोन हजार वर्षांपूर्वी बांधलेल्या टॉवर ऑफ डेव्हिड पासून सुरूवात करून पाचशे वर्ष जुन्या आणखी एका टॉवरच्या शिखरावर हेथिर लार्सन पोहचली. 


सुरुवातीला एक दोनदा तोल जातोय की काय असं वाटलं खरं. पण त्यानंतर हिथरनं हे अंतर अगदी लिलया पार केलं.