लॉस एन्जेलिस : प्रसिद्ध हॉटगुरू विक्रम चौधरी आणि त्याची पत्नी राजश्री यांचा घटस्फोट झालाय. गेल्या महिन्यात हा घटस्फोट फायनल झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, राजश्रीला पोटगी म्हणून ब्रेवरी हिल्स आणि लॉस एन्जेलिसचं घर सोबतच फेरारी, मर्सिडीज ५५० आणि बेन्टले कार मिळणार आहे.  यानंतर राजश्री विक्रम चौधरीवर कोणताही खटला दाखल करणार नाही.   


याशिवाय विक्रमविरुद्ध १० खटले सुरू आहेत. यातील सहा खटले बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराचे आहेत. या आरोपांनंतर ५० वर्षीय राजश्री यांनी विक्रमशी असलेलं ३१ वर्ष जुनं नातं तोडण्याचा निर्णय घेतला होता.  


विक्रम आणि राजश्री यांना एक मुलगा आणि एक मुलगीही आहे. सध्या, विक्रम अमेरिका सोडून भारतात परतलाय. सध्या त्यानं लोणावळ्यात आपलं बस्तान बसवल्याचं समजतंय.