पोर्ट लुईस : दोन वर्षांपूर्वी मलेशिअन एअरलाईन्स MH370 हे विमान अचानक गायब झालं होतं. त्याचे अवशेष आता मॉरिशसच्या किनाऱ्यावर सापडल्याचं मेलेशिअन एअरलाईननं म्हटलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर मॉरिशिअसच्या किनाऱ्यावर मे महिन्यात विमानाच्या पंखाचे अवशेष सापडले. हे अवशेष तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. आता त्याचा अहवाल नुकताच समोर आलाय.  


ऑस्ट्रेलियन ट्रान्सपोर्ट सेफ्टी ब्युरोनं अवशेषांची तपासणी करून ते एमएच 370चेच असल्याचं स्पष्ट केलयं. दरम्यान या ब्युरोनं विमानाचे आणखी काही अवशेष शोधण्यासाठी समुद्रात शोध सुरू केलाय. 


8 मार्च 2014 रोजी क्वालालंपूरहून बीजिंगला निघालेलं हे विमान अचानक झालं होतं. या विमानात 239 प्रवासी होती.