मॅन्चेस्टर : हातामध्ये स्मार्टफोन आल्यामुळे अनेक काम आजकाल सोपी झाली आहेत. स्मार्टफोनमुळे ऑनलाईन वस्तू खरेदी आणि विक्री करण्याचंही प्रमाण वाढलं आहे. अशाच एका अॅपवर एका मुलीनं तिचा न्यूड फोटो टाकला. हा फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडच्या मॅन्चेस्टरमध्ये राहणाऱ्या 25 वर्षांच्या जेसीकाला तिचा सोफा विकायचा होता. यासाठी बाईंग-सेलिंग अॅपवर तिला सोफ्याचा फोटो अपलोड करायचा होता, पण घाईमध्ये तिनं सोफ्याऐवजी स्वत:चाच न्यूड फोटो अॅपवर अपलोड केला. 


अॅपवर हा फोटो दिसल्यामुळे अनेकांसाठी हा चर्चेचा विषय ठरला होता. लोकांचं लक्ष आकर्षित करण्यासाठी हा फोटो टाकण्यात आल्याची टीकाही काहींनी केली होती. पण या मुलीनं मात्र या प्रकरणाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.