इराण : महिलांच्या चुकीच्या पेहरावामुळे नद्या कोरड्या पडतात असा शोध एका मोलवीने लावला आहे. दुष्काळामुळे नद्या आणि विहीर कोरड्या पडतात. मात्र महिलांच्या चुकीच्या पेहरावामुळे इराणमधल्या निसर्गावर त्याचा वाईट परिमाण होत आहे, म्हणून नद्या कोरड्या पडत असल्याचं इस्लामिक रिपब्लिकच्या ज्येष्ठ मौलवी म्हणाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सय्यद युसूफ तबाताबी नेजद या मौलवींनी, महिलांच्या चुकीच्या पेहरावामुळे निसर्गावर विपरीत परिणाम होत आहे, पोलिसांनी हे रोखण्यासाठी पावलं उचलण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.


आयएसएनए या न्यूज एजन्सीनं म्हटलं आहे, सय्यद युसूफ तबाताबी नेजद या मौलवी म्हणतात, 'माझ्या ऑफिसमध्ये महिलांच्या चुकीच्या पेहरावामुळे नद्या कोरड्या पडत आहेत.


एवढंच नाही मौलवी सय्यद युसूफ तबाताबी नेजद यावर थांबलेले नाहीत, ते म्हणतात, आवश्यकता भासल्यास या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी पोलीस बळाचाही वापर करायला हवा, तसेच दूरसंपर्क मंत्रालयानं हे सर्व प्रकार तातडीनं रोखले पाहिजेत.