वॉशिंग्टन : दहशतवाद्यांना वारंवार अभय देण्याच्या पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेनं सडकून टीका केली आहे. अमेरिकेनं पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयला दहशतवाद्यांना मदत करण्याचं बंद करा, अन्यथा पाकिस्तानात घुसून दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करू, असा इशारा दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे टेररिझम आणि फायनान्शियल इंटेलिजिएन्सचे अ‍ॅक्टिंग अंडर सेक्रेटरी अ‍ॅडम जुबिन यांनी पाकिस्तानला हा इशारा दिला आहे. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी अमेरिकेनं पाकिस्तानला नेहमीच पाठिंबा दिला आहे. मात्र पाकमधील आयएसआय ही संघटना दहशतवाद्यांवर कारवाई करत नाही. अशीच परिस्थिती राहिल्यास पाकिस्तानमधील दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी अमेरिका मागेपुढे पाहणार नाही असं अ‍ॅडम जुबिन म्हणाले आहेत.


पाकिस्तानातील दहशतवाद्यांबाबतचे पुरावे भारतानं वारंवार दिले मात्र पाकिस्ताननं त्याकडं नेहमीच दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.