नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र महासभेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी जोरदार भाषण केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील त्याचं कौतूक केलं. भाषणामध्ये सुषमा स्वराज यांनी अनेकांना खडसावलं आणि रोखठोक भूमिका जगासमोर मांडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं आहे की, कोणत्यातरी देशाचा परराष्ट्रमंत्र्यांच्या भाषणानंतर त्यांना भेटण्यासाठी जगभरातील नेत्यांनी रांग लावली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.



यूएन वार्षिक महासभेत भाषण झाल्यानंतर भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज हॉलमधून जेव्हा बाहेर पडल्या तेव्हा त्यांनी केलेल्या भाषणाचं कौतूक करण्यासाठी अनेक जण एका रांगेत उभे होते. सगळ्यात पुढे होते ओमनचे अर्थमंत्री अलावी.


सुषमा स्वराज यांच्या भाषणानंतर युएनमधल्या पाकिस्तानच्या प्रतिनिधी मलीहा लोधीने प्रतिक्रिया दिली पण त्यांनी फक्त आरोपांचं खंडन केलं बाकी काही बोलू शकल्या नाहीत. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परदेशसंबंधित विभागाचे सल्लागार सरताज अजीज यांनी देखील प्रतिक्रिया दिली. ते बोलले की, पाकिस्तानला जगातील देशाच्या समुहातून वेगळा करण्याचा भारताचा प्रयत्न कधी यशस्वी होणार नाही. पण त्यांच्याकडे देखील बोलण्यासाठी अजून काही नव्हतं.