बिजिंग : जगातली सर्वात मोठी दुर्बिण चीनमध्ये प्रस्थापित करण्यात आलीय. या दुर्बिणीचा आकार इतका मोठा आहे की ही दुर्बिण साऱ्या जगाच्या खगोलतज्ञामध्ये चर्चेचा विषय बनलीय. FAST असं या दुर्बिणीचं नाव आहे. 


अर्धा किलोमीटर व्यासाच्या या दुर्बिणीचा एकूण आकार 30 फुटब़ॉल ग्राऊंड इतका आहे. यासाठी एकूण 1 कोटी 80 लाख डॉलर्स खर्च करून ही दुर्बिण तयार करण्यात आली आहे. चीनच्या आंतराळ संशोधन कार्यासाठी हे मोठं पाऊल असल्याचं त्यांच्या खगोल तज्ज्ञांचं म्हणणं आहे. येत्या काही दिवसातच चीनी अंतराळ संशोधक या दुर्बिणीच्या चाचण्या सुरू करतील असंही चीनी वृत्तसंस्थांचं म्हणणं आहे.