या तरुणीच्या लग्नाआधी सेक्समुळे पाकिस्तानात वाद
लग्नापूर्वी सेक्स केला आणि त्यावर एका तरुणीने लिहिलेला लेख सध्या पाकिस्तानमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. यामुळे सोशल मीडियावर चांगलाच वाद रंगला आहे.
कराची : लग्नापूर्वी सेक्स केला आणि त्यावर एका तरुणीने लिहिलेला लेख सध्या पाकिस्तानमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. यामुळे सोशल मीडियावर चांगलाच वाद रंगला आहे.
जेहरा हैदर या तरुणीने 'पाकिस्तानात लग्नाआधी सेक्सने मी काय शिकले' हा लेख लिहिला आणि पाकिस्तानात चर्चांना उधान आलं.
आपल्या १९ व्या वाढदिवसाआधी टोरंटोमध्ये वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानात लग्नाच्या आधीच्या अनुभवांना आणि घरी आई-वडिलांना माहिती पडल्यानंतर काय झालं यावर लेख लिहिला आहे.
हैदरी लिहते की, 'जेव्हा माझ्या नातेवाईकांना माहित पडलं तेव्हा त्यांनी याला नाटकीय पद्धतीने घेतलं. पाकिस्तानात सेक्स एक प्रतिबंधित विषय आहे. पुरुषांचं वर्चस्व असलेल्या या समाजात पुरुषांबाबत कोणतीच गोष्ट नाही सांगितली जात. पण कोणती गरीब घरातील मुलगी सेक्स करतांना पकडली गेली तर त्यावर वाद होतो.'