मुंबई : शाहरुख खानच्या नुकताच रिलीज झालेल्या रईस या सिनेमामध्ये 9 चुका पाहायला मिळाल्या आहेत. अनेकांनी या सिनेमाचं कौतूक केलं पण या चुका लपून राहिलेल्या नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. ओढणी कुठून आली - सिनेमामध्ये शाहरुख आणि माहिरावर एक गाणं आहे. सिनेमा दरम्यान रईस हा आसियाच्या रुपममध्ये येतो तेव्हा आसियाच्या सलवार सूटवर ओढणी नसते पण जेव्हा दोघांमध्ये रोमँटिक सिन सुरु होते तेव्हा तिच्या गळ्यात ओढणी असते.


2. सिनेमामध्ये पोलीस इंस्पेक्टर जयदीप (नवाजुद्दीन सिद्दीकी) रोड रोलरने दारुची बॉटल फोडतांना दाखवलं आहे. पण जवळ करुन पाहिलं तर असं दिसलं की ती बॉटल रॉयल स्टॅगची आहे. सिनेमा हा 80 च्या दशकातला आहे पण रॉयल स्टेग भारतात 1995 मध्ये लॉन्च झाला होता.


3. एका सीनमध्ये रईसवर गोळी चालते. ते काचेच्या खिडकीच्या पुढे आहेत. पण गोळी लागल्यानंतर ते दुसऱ्या बाजुला कसं जाऊन पडतो.


4. एका सीनदरम्यान रईस राजकारण्याच्या घरी रॅली घेऊन जातो. रॅली रोखण्यासाठी पोलीस अश्रृ धूरचा वापर करते पण याचा रईसवर काहीच परिणाम होत नाही. बाकी सगळे लोकं पळतांना दिसत आहेत. 


5. एका सीनमध्ये शाहरुख एका गोळीमध्ये 2 लोकांना मारतांना दिसतोय. त्याच्या बंदुकीतून एकच गोळी निघते पण दोन लोकं उडतांना दिसत आहेत.


6. पहिल्या सीनमध्ये रईस आणि झाडांच्या मध्ये अंतर कमी असतं. तर पुढच्या सीनमध्ये ते अंतर वाढलेलं दिसतंय.


7. एका सीनमध्ये रईस (शाहरुख) गॅलरीमधून पडलेला बॉल परत करण्यासाठी आसिया (माहिरा खान) च्या घरी जातो. आसियाची आई दरवाजा उघडते आणि रईस आतमध्ये जातो. त्यानंतर आई दरवाजा बंद करते. मग प्रश्न असा पडतो की जर रईस जर काही मिनटासाठी बॉल देण्यासाठी जातो तर आसियाची आई दरवाजा का लावते.


8. सिनेमाच्या प्रत्येक सीनमध्ये रईस (शाहरुख) चष्म्यामध्ये दिसतो. कारण सिनेमाच्या सुरुवातीलाच सांगण्यात आलं होतं की त्याला चष्म्याशिवाय काहीही दिसत नाही. मुहर्रममधील एका सीनमध्ये रईस बिना चष्म्याचा दिसतो. त्यानंतर त्य़ाच्यावर हल्ला होतो आणि हल्ला करणाऱ्याला रईस मारतो पण तेव्हा त्याने चष्मा घातलेलाच नसतो.