मुंबई :  सलमान खाननं बलात्कार पीडित महिलेबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता आमीर खानची जीभही घसरता घसरता वाचली. दंगल सिनेमाच्या पोस्टर रिलीजवेळी आमीरनं हे वक्तव्य केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान किंवा शाहरुख जेव्हा समोर येतात तेव्हा स्टार आल्यासारखं वाटतं. पण मी समोर आलो की कोणीतरी वेटर आल्यासारखं वाटतं असं आमीर म्हणाला. पण वेटरबाबतच्या या वक्तव्यावर लगेचच आमीरनं माफीही मागितली. वेटर ही चांगली लोकं असतात, मी असं म्हणायला नको होतं, असं आमीर म्हणाला आहे.