मुंबई: बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खानचं नाव आजपर्यंत अनेक अभिनेत्रींबरोबर जोडलं गेलं. पण अजूनपर्यंत सलमाननं लग्न मात्र केलं नाही. सलमानलाही आत्तापर्यंत अनेक वेळा त्याचा लग्नाबाबत विचारण्यात आलं, पण तरीही त्यानं याबाबत बोलणं नेहमीच टाळलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता मात्र बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खाननच सलमानच्या लग्नाबाबत वक्तव्य केलं आहे. मी आजपर्यंत सलमानचं लग्न व्हावं यासाठी फारसे प्रयत्न केले नाहीत, पण जर मी पूर्ण प्रयत्न केले तर सलमान नक्कीच लग्नाला तयार होईल असं आमिर म्हणाला आहे.


आमिर खानचा आज 51 वा वाढदिवस आहे. यानिमित्त त्यानं एक पत्रकार परिषद घेतली, तेव्हा बोलताना त्यानं हे वक्तव्य केलं आहे.