मुंबई : वि. वा. शिरवाडकर यांच्या 'नटसम्राट' या अप्रतिम कलाकृतीवर आधारित महेश मांजरेकर दिग्दर्शित 'नटसम्राट : असा नट होणे नाही' या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रेक्षकांना तो केवळ आवडलाच नाही तर तो भावला. जबरदस्त अभिनय, दमदार संवादांनी परिपूर्ण असलेल्या या चित्रपटाचे बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननेही कौतुक केलेय. ट्विटरवरुन त्याने या चित्रपटाचे कौतुक केलेय.


'मी हा चित्रपट पाहिला. जबरदस्त चित्रपट आहे. नानांचा अभिनय दमदार आहे. तसेच विक्रम गोखलेंनीही तोडीस तोड अभिनय केलाय. खरंच 'असा नट होणे नाही'. महेश, नाना, विक्रमजी आणि संपूर्ण टीमने छान काम केलयं.' अस आमिरने ट्विट केलंय.